Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > बँक ऑफ बडोदा FD वर देत आहे जबरदस्त व्याज! ₹२ लाखांवर मिळवा ₹८४,३४९ पर्यंत 'गॅरंटीड' रिटर्न

बँक ऑफ बडोदा FD वर देत आहे जबरदस्त व्याज! ₹२ लाखांवर मिळवा ₹८४,३४९ पर्यंत 'गॅरंटीड' रिटर्न

Bank of Baroda Savings Scheme : एफडी खात्यांमध्ये, ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर निश्चित व्याजासह जमा केलेले संपूर्ण पैसे परत मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 17:24 IST2025-11-06T16:08:39+5:302025-11-06T17:24:17+5:30

Bank of Baroda Savings Scheme : एफडी खात्यांमध्ये, ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर निश्चित व्याजासह जमा केलेले संपूर्ण पैसे परत मिळतात.

Bank of Baroda FD Rates 2025 Get Guaranteed 7.20% Interest on Fixed Deposits | बँक ऑफ बडोदा FD वर देत आहे जबरदस्त व्याज! ₹२ लाखांवर मिळवा ₹८४,३४९ पर्यंत 'गॅरंटीड' रिटर्न

बँक ऑफ बडोदा FD वर देत आहे जबरदस्त व्याज! ₹२ लाखांवर मिळवा ₹८४,३४९ पर्यंत 'गॅरंटीड' रिटर्न

Bank of Baroda Savings Scheme : सध्या भारतीय बाजारात अनेक बँका मुदत ठेवीवर चांगले व्याजदर देत आहेत. यामध्ये सरकारी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाकडून ग्राहकांना आकर्षक व्याजदरांची ऑफर दिली जात आहे. बँक ऑफ बडोदामध्ये किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडता येते. बँक ऑफ बडोदा एफडी खात्यांवर ३.५० टक्क्यांपासून ते ७.२० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. या योजनेत तुम्ही फक्त २ लाख जमा करून ८४,३४९ रुपयांपर्यंत निश्चित आणि गॅरंटीड व्याज मिळवू शकता.

४४४ दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याज
बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना ठराविक कालावधीनंतर निश्चित व्याजासह संपूर्ण जमा केलेली रक्कम परत मिळवण्याची संधी देत आहे. बँक ऑफ बडोदा ४४४ दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांना ६.६० टक्के, ज्येष्ठ नागरिक ७.१० टक्के आणि सुपर ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांवरील) यांना ७.२० टक्के व्याजदर मिळत आहे.

५ वर्षांच्या FD वर ७.१०% पर्यंत व्याज
बँक ऑफ बडोदा ५ वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर देत असलेले व्याजदर खालीलप्रमाणे आहेत.

ग्राहक श्रेणी ५ वर्षांसाठी व्याजदर
सामान्य नागरिक६.४० टक्के
ज्येष्ठ नागरिक७.०० टक्के
सुपर ज्येष्ठ नागरिक७.१० टक्के

२,००,००० रुपये जमा केल्यास किती फायदा?
जर तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये ५ वर्षांच्या एफडी योजनेत २,००,००० रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे असेल.
| ग्राहक श्रेणी | वार्षिक व्याजदर (५ वर्षांसाठी) | व्याजाची निश्चित रक्कम | मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम |
| सामान्य नागरिक (६० वर्षांखालील) | ६.४०% | ७४,७२९ रुपये | २,७४,७२९ रुपये |
| ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) | ७.००% | ८२,९५६ रुपये | २,८२,९५६ रुपये |
| सुपर ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांवरील) | ७.१०% | ८४,३४९ रुपये | २,८४,३४९ रुपये |

ग्राहक श्रेणी वार्षिक व्याजदर (५ वर्षांसाठी) व्याजाची निश्चित रक्कम मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम 
सामान्य नागरिक (६० वर्षांखालील) ६.४०% ७४,७२९ रुपये २,७४,७२९ रुपये 
ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) ७.००% ८२,९५६ रुपये २,८२,९५६ रुपये 
सुपर ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांवरील) ७.१०% ८४,३४९ रुपये २,८४,३४९ रुपये 

वाचा - सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..

सुपर ज्येष्ठ नागरिकांनी २ लाख जमा केल्यास, त्यांना ५ वर्षांत ८४,३४९ रुपयांचा निश्चित व्याज परतावा मिळेल. सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही FD योजना एक चांगला पर्याय ठरू शकते.

Web Title : बैंक ऑफ बड़ौदा FD पर दे रहा है शानदार ब्याज! निश्चित रिटर्न!

Web Summary : बैंक ऑफ बड़ौदा आकर्षक FD दरें प्रदान करता है, जो 7.20% तक हैं। वरिष्ठ नागरिक 5 वर्षों में ₹2 लाख जमा पर ₹84,349 तक की गारंटीड रिटर्न अर्जित कर सकते हैं। 444 दिनों की FD पर सबसे अधिक ब्याज दरें हैं।

Web Title : Bank of Baroda FD offers high interest; guaranteed returns!

Web Summary : Bank of Baroda offers attractive FD rates, up to 7.20%. Senior citizens can earn up to ₹84,349 guaranteed return on ₹2 lakh deposit over 5 years. 444-day FD offers highest interest rates.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.